शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने सफेद रंगाच्या कारमधून लाखोंचा गांज्याची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याची माहिती गुप्त माहितीदारा मार्फत नरडाणा पोलिसांना मिळाली होती. माळीच पोलीस चौकीसमोर हे वाहन मुंबई आग्रा महामार्गावर वरून जाताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ या वाहनाचा पाठलाग केला करत पकडले.
दोन लाखाचा गांजा
काही अंतरावर वाहनाला पोलिसांनी थांबवत तपासणी केली. तर त्यामध्ये 24 किलो 690 ग्रॅम वजनाचा गांज्या पोलिसांनी हस्तगत केला आहे. ज्याची बाजारामध्ये एक लाख 97 हजार 520 रुपये किंमत मानली जात आहे. कारवाईदरम्यान नरडाणा पोलिसांनी जवळपास सहा लाख 97 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाई नरडाणा पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.
0 Comments