धुळे : उज्जैन येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला दरोडेखोरांकडून वाहनावर दगडफेक करून त्याचबरोबर चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले आहे. हा प्रकार धुळे तालुक्यातील आर्वी या ठिकाणी घडला आहे
उज्जैन येथून दर्शन घेऊन परतलेल्या भाविकांचे वाहन धुळे तालुक्यातील आर्वी या ठिकाणी काही वेळासाठी थांबले. याचवेळी पहाटेच्या दरम्यान काही दरोडेखोरांनी वाहनावर अचानकपणे दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. त्याचबरोबर वाहनात बसलेल्या भाविकांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेला ऐवज लुटून घटनास्थळावरून पोबारा केला आहे.
दोन भाविक जखमी
पोलिसांना या संदर्भातील घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. परंतु तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. या वाहनातील भाविकांपैकी दोन भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले असून या दरोडेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.
0 Comments