घराला लागलेल्‍या आगीत आठ महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याचा मृत्‍यू

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील उगावजवळील खेडे या गावात आग लागली होती. या आगीत जखमी आठ महिन्याचा जेहान अश्फाक शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू   
अश्पाक याकुब शेख यांच्या घराला आग लागली होती. यात आठ महिन्याचा जेहान अश्फाक शेख हा 60 टक्के भाजला होता. या बालकाचा दहा दिवसांपासून उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्‍याचा मृत्यू झाला आहे. 15 डिसेंबरला आई घरात काम करत असताना ही घटना घडली होती. घरातील लाईट गेली असताना आई घरात स्वयंपाक करत होती.

लाईट येताच गादीला आग

सायंकाळी लाईट आल्याने अचानक घरात आग लागली. यात जेहान झोपलेल्या गादीला आग लागली होती. गादीवर झोपलेल्या जेहान यात 60 टक्के भाजला होता. जेहानला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्‍‍णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी जेहानचा मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e