डहाणू तालुक्यातील कासा येथे शुक्रवारी (30 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. पूनम पिंटू भोमटे असं जखमी तरुणीच्या नाव आहे. या हल्ल्यात पूनमच्या डोक्याला आणि हाताला जबर मार लागला आहे. कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथामिक उपचार करण्यात आल्यानंतर पूनमला पुढील उपचारासाठी सिलवासा येथे पाठवण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम ही पोलीस भरतीची पूर्व तयारी करीत होती. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे रनिंग करण्यासाठी बाहेर पडली. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या घटनेत पूनम गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे. कासा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे
0 Comments