नवीन रंजन गिरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गोरेगाव पोलिसांनी त्याला बिहार येथून अटक केली आहे. आरोपी नवीन याने फोन करून उर्फीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही तर तुझ्यावर बलात्कार करू असं म्हणत आरोपीने उर्फीला शिवीगाळ देखील केली होती.
या सर्व प्रकारानंतर उर्फी जावेदने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता. दरम्यान, धमकी देणारा आरोपी हा बिहार येथील असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवीन याला पटना येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. अटक करून पोलिसांनी नवीनला मुंबईत देखील आणलं आहे.
उर्फीला धमकी देणारा कोण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवीन गिरी हा रिअल इस्टेट ब्रोकर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने उर्फीला भाड्याने फ्लॅट मिळवून दिला होता. त्यासाठी कमिशन म्हणून ठराविक रक्कम उर्फी नवीन याला देणार होती. मात्र, आरोपीच्या म्हणण्यानुसार अभिनेत्री उर्फी जावेद त्याला ठरलेले कमिशन देत नव्हती. म्हणूनच नवीनने उर्फीला व्हॉट्सअॅपवर फोन करून पैशासाठी धमकावण्यास सुरुवात केली होती.
0 Comments