गरजू अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन साईलीला डेव्हलपर्सचे संचालक दीपक देसले व संजय शहा यांनी दिले होते. त्यानुसार दहा कुटुंबीयांना निवासासाठी प्रत्येकी ५०० स्क्वेअरफूट जागा उपलब्ध करून देण्यात आली. बेघर झालेल्या कुटुंबांना ही जागा देण्यात आली. या वेळी या दहाही कुटुंबीयांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.गरजू गरीब कुटुंबातील दहा लाभार्थ्यांना प्रत्येकी ५०० स्क्वेअरफूट जागा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नगरपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी नगरपंचायत प्रशासक प्रशांत बिडगर यांनी सहकार्य करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दहाही कुटुंबीयांना पंतप्रधान आवास योजनेतून निधी उपलब्ध करून देत त्यांचे हक्काचे घर मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश देसले, दीपक अहिरे, प्रा. सतीश पाटील, विधिज्ञ नीलेश देसले यांनी मनोगत व्यक्त केले. बेघर कुटुंबीयांकडून यश मराठे यांनी मनोगत व्यक्त करीत साईलीला डेव्हलपर्सचे संचालक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. हाजी शेख करीम अध्यक्षस्थानी होते.पोलिस निरीक्षक सुनील भाबड, माजी नगरसेवक सुनील चौधरी, धर्मराज पाटील, गिरीधर वाघ, गिरीश देसले, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दीपक देसले यांनी प्रास्ताविक केले. नीलेश देसले यांनी आभार मानले.
0 Comments