कंत्राट दुसऱ्याला दिलं, रस्त्यात गाठून एमआयडीसीतील मॅनेजरच्या डोक्यात रॉड घातला, डोंबिवलीतील प्रकरणाचा उलगडा

डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी एमआयडीसीत काम करणाऱ्या सुरेंद्र मौर्या यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. पोलिसांनी २० दिवसांमध्ये या प्रकरणाचा उलगडा करुन मारेकऱ्यांना शोधले आहे.

डोंबिवली : फर्निचरच्या कामाचे कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील डोंबिवली एमआयडीसी, म्हात्रेनगर परिसरात फेब्रुवारीत घडली होती. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हल्ला प्रकरणातील मास्टरमाइंडसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. मुख्य आरोपी पंकज पाटील, शैलेश राठोड, सुशांत जाधव आणि महेश कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.
हल्लेखोरांवर लूटमार, मारहाणीचे गुन्हे पंकजवर तीन, सुशांतवर पाच, शैलेश याच्याविरोधात चार, तर महेशविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. नारपोली, मानपाडा, कोळसेवाडी, धारावी, नागपाडा पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. आरोपी पंकजला फर्निचरचे कंत्राट मिळाले होते. त्याचे कंत्राट कमी करून ते इतर कंत्राटदाराला दिले.या रागातून पंकज आणि शैलेश यांच्या सांगण्यावरून सुशांत आणि महेशने मौर्या यांच्यावर हल्ला केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
सुरेंद्र मौर्या हे एमआयडीसीमधील एका कंपनीत मॅनेजर आहेत. १५ फेब्रुवारीला संध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर दुचाकीने घरी जात होते. त्यांची गाड़ी म्हात्रेनगर परिसरात आली असता अचानक पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी थांबवून त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. सुरेंद्र मौर्या यांना जखमी करून हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हल्ला प्रकरणातील तीन त्याच्या मास्टरमाइंडसह साथीदारांना अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e