शहरात घरफोडी करणारी धुळ्यातील टोळी जेरबंद; 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अंबड गुन्हे शोध पथकाने शहरात घरफोडी, चोरी करणाऱ्या धुळे येथील टोळीस वीस लाखांच्या मुद्देमालासह अटक केली. 
सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खतेले व हवालदार संजीव जाधव यांना गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. घरफोडी करणारी टोळी धुळे येथून नाशिकमध्ये येत अन् घरफोडी करून पुन्हा धुळ्यात निघून जात. यानंतर गुन्हे शोध पथकाने कंबर कसून चौकशी सुरू केली.संशयित हेमंत ऊर्फ सोन्या किरण मराठे (२८, रा. पेठ रोड, पंचवटी, मुळ रा. धुळे) हा रिक्षाचालक असून हा विविध परिसरामध्ये रेकी करून बंद घरांची माहिती गोळा करायचा आणि नंतर धुळे येथील संशयित सौउद अहमद मोहंमद सलीम अन्सारी (२१, रा.धुळे) यास द्यायचा. या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांनी साथीदार शाकीर ऊर्फ पप्पू बम इब्राहिम शहा (३२, रा. धुळे), तौसिफ ऊर्फ मामू अजीज शहा (३०, रा. धुळे), समीर सलीम शहा (२३, धुळे), इस्माईल ऊर्फ मारी अहमद शेख (२०, धुळे), वसीम जहिरुद्दीन शेख, (३२ रा. धुळे) यांची नावे स्पष्ट केली. हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
अंबड गुन्हे शोध पथकाचे खतेले व सहकाऱ्यांनी धुळे येथे जाऊन सापळा रचत सर्वांनाच अटक केली. चौकशीत त्यांनी नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालपैकी २०,६९,००० रुपये किमतीचे सोने, चांदी, कार, दोन टिव्ही, मोबाईल फोन व इतर वस्तु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर कामगिरी गुन्हे शोध पथकाचे वसंत खतेले, पवन परदेशी, किरण गायकवाड, सचिन करंजे, दीपक शिंदे, समाधान शिंदे, प्रवीण राठोड, अनिल ढेरंगे, राकेश राऊत, संदीप भुरे, सागर जाधव, जनार्दन ढाकणे, घनशाम भोये, अनिल गाढवे यांनी केली. अधिक तपास पोलिस वसंत खतेले व अनिल ढेरंगे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e