कल्याण हादरले; अल्पवयीन मुलीवर चौघांचा सामूहिक अत्याचार, इन्स्टाग्रामवर झाली होती मैत्री

कल्याणमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याने कल्याण हादरले आहे. या चौघांची या तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती.
कल्याण मध्ये राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या अनुषंगाने कोळशेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय पीडित तरुणीची इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या तरुणाने माझे प्रेयसी सोबत भांडण झाले आहे, असे सांगून
तिला भेटण्यास बोलवून घेतले. तसेच यावेळी तिला रूमवर घेऊन जात तिच्यावर अतिप्रसंग करत तिच्यावर बलात्कार केला. तसेच दुसऱ्या दिवशीही बोलवून तिच्यावर अतिप्रसंग केला. इतकेच नाही, तर यावेळी तिच्यावर आणखी तीन जणांनी अतिप्रसंग केला.
कुटुंबीयांनी दिली तरुणी हरवल्याची तक्रार
दरम्यान पीडित तरुणीच्या घरच्यांनी ती हरवली असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या अनुषंगाने तपास करत पीडित तरुणीची सुटका केली. तसेच कोळसेवाडी पोलिसांनी अधिक तपासात केला असता तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार तरुणांपैकी एक अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. तर आरोपी साहिल राजभर , सुजल गवळी आणि विजय बेरा अशी या आरोपींची नावे आहेत. तर यातील एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास वरिष्ट पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e