ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर निधन, राजीनामा, अर्हता किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. शहादा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींतील ५१ प्रभागांतून ५९ रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मंगळवारपासून सुरवात झाली असून, २ मेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुटी वगळता नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहे.
३ मेस दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. ८ मेस नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत राहणार असून, १८ मेस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात येईल. दुसऱ्या दिवशी १९ मेस सकाळी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गिरासे यांनी दिली.या ग्रामपंचायतींसाठी निवडणूकसावखेडा, करजई, बुपकरी, मलोनी, असलोद, टेंभली, पाडळदा बुद्रुक, कमरावद, शोभानगर, लांबोळा, वढे त.श., डामरखेडा, कानडी त.श., औरंगपूर, तऱ्हाडी त.बो., पळसवाडा, परिवर्धा, कानडी त. ह. मडकाणी, तलावडी, अमोदा, सुलवाडे, लक्कडकोट, खेडदिगर, दुधखेडा, पिंपर्डे, कोचरा, कुरंगी, कर्जांत, चांदसैली, टवळाई, मलगाव, मंदाणा, ओझरटा, जावदे त.ह., भोंगरा, वडगाव, लंगडी-भवानी, खापरखेडा, काकर्दे-दिगर व कोंढावळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे
0 Comments