६ लाख ५० हजारांच्या खंडणीप्रकरणी भूमि अभिलेख कार्यालयातील महिला कर्मचा-यासह एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड  येथील तालुका भूमि अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी जमिनीचे काम करून देण्यासाठी एका नागरिकाकडून ६ लाख ५० हजार रूपये उकळले. याप्रकरणी संबंधित नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी  दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे
तालुक्यातील वेताळवाडी येथील एक नागरिक जमिनीच्या कामासाठी तालुका भूमि अभिलेख कार्यालयात जुलै २०२१ मध्ये गेला होता. आपले काम पूर्ण करून देण्यासाठी भुमि अभिलेख कार्यालयातील दाेन कर्मचा-यांनी जुलै २०२१ ते जानेवारी २०२३ या कालावधीत नागरिकास ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली.
रक्कम न दिल्यास तुमच्या जमिनीच्या कामावर परिणाम होईल, काम होणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने पाेलिसांत दिलेल्या तकारीत नमूद केले आहे. काम होण्यासाठी या दोन कर्मचायांनी खेड उपअधीक्षक कार्यालय तसेच नागरिकाच्या वेताळवाडी येथे घरी कधी स्वतः पैसे घेतले
काही वेळेला संशयितांच्या हस्तकाद्वार रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात ६ लाख ५० हजार रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनुसार  पोलीसांनी शिवानंद टोपे आणि सायली धोत्रे या भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचा-यांवर (भा.द.वी 384 व 34 कलमान्वये) गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e