प्रेमची मावशी नवनीतनगरात राहत असल्याने त्याचे आई-बाबाकडे जाणे-येणे होते. शुक्रवारी सकाळी प्रेम आईला भेटायला आला. तेव्हा त्याची आई रक्ताच्या थारोड्यात पडली होती.
दोन्ही मुले नातेवाईकांकडे राहायची
भांडणाची तक्रार नातेवाईकांकडे केल्यास ते त्या दोघांना आर्वीला परत या, असं सांगायचे. पण, ते दोघेही कसेतरी अडजस्ट करून घेत होते. माधुरी आणि मनोजला दोन अपत्य आहेत. मोनिका ही १८ वर्षांची तर प्रेम हा १२ वर्षांचा आहे. मोनीका आर्वी येथे नातेवाईकांकडे राहत होती. तर प्रेम त्याच्या मावशीकडे मुक्कामी राहायचा.
मुलाने बघीतला आईचा मृतदेह
प्रेमची मावशी नवनीतनगरात राहत असल्याने त्याचे आई-बाबाकडे जाणे-येणे होते. शुक्रवारी सकाळी प्रेम आईला भेटायला आला. तेव्हा त्याची आई रक्ताच्या थारोड्यात पडली होती. त्याचे वडील कुठंही दिसले नाही. त्याच्या आईच्या डोके, पोट आणि तोंडावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या.
मनोजला आर्वी येथून अटक
आईला पाहताच प्रेमने टाहो फोडला. शेजारी जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपायुक्त अनुराग जैन, पोलीस निरीक्षक प्रवीण तिजारे, पोलीस निरीक्षक प्रदीप रायणावर यांनी घटनास्थळ गाठले. माधुरीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
वाडी पोलिसांना मनोजचा शोध घेतला. मनोजला आर्वी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने रात्रीचा थरार सांगितला. त्या दोघांमध्ये रात्री भांडण झाले. त्यानंतर मनोजने माधुरीवर वार करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. पण, शेवटी पोलिसांच्या ताब्यात आला.
आधीच नातेवाईकांकडे राहत असलेली मुलं आता पूर्णपणे नातेवाईकांवर अवलंबून राहणार आहेत. कारण आई गेली. वडीलांना पोलिसांना अटक केली. दारुने पुन्हा एक संसार उद्ध्वस्त झाले आहे
0 Comments