नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे यांच्या ताफ्यातील एका वाहनाला भरधाव गाडी चालकाने कट मारला. त्यानंतर तो पळून जात होता. मात्र त्या वाहनाचा दादा भुसे यांनी सुचना करून पाठलाग केला. कट मारणारी पीकअप व्हॅन त्यांनी पकडली. यावेळी अगदी सिनेस्टाईल थरार बघायला मिळाला. कट मारून पळणाऱ्या गाडीला त्यांनी पकडले.
मात्र या पिकअप वाहनाला पकडल्यानंतर भलताच प्रकार उघडकीस आला. या वाहनातून चक्क अवैध गोवंश वाहतूक करण्यात येत होती. वाहनचालकाने कट मारत वाहन जोरात पळवले. मात्र, त्याच वेळी दादा भुसेंनी पोलिसांना त्या गाडीचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्या गाडीला रोखले.
मंत्री भुसे यांनी त्या वाहनचालकाची कानउघडणी केली. यावेळी त्या वाहनचालकाबाबत संशय आल्याने दादा भुसेंनी त्या गाडीची चौकशी केली असता एक वेगळा गुन्हा उघडकीस आला. त्या गाडीतून अवैधरित्या गोवंश मांस वाहतूक सुरु असल्याचे समोर आले. तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दादा भुसे यांनी पोलिसांना दिले आहे.
0 Comments