धुरखेडा येथे शेतातील उच्च दाबाच्या मनोर्‍यामुळे नुकसान, आत्मदहनाचा इशारा

शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील शेतकर्‍याच्या शेतातील वीज वितरण कंपनीच्या  अतिउच्च दाबाच्या मनोर्‍यामुळे  शेतातील उभ्या पिकाचे व शेत जमिनीचे नुकसान होत आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व संबंधित विभागाकडे वारंवार लेखी तक्रार करूनही दखल न घेतल्याने शेतकरी जगन्नाथ केशव चौधरी यांनी आत्मदहन  करण्याचा इशारा दिला आहे.

धुरखेडा येथील शेतकरी जगन्नाथ केशव चौधरी व सौ.वंदना जगन्नाथ चौधरी यांच्या मालकीचे व ताबे उपभोगातील धुरखेडा शिवारामधील गट नंबर 108/1 मधील क्षेत्र दोन हेक्टर 48 आर.शेत जमीन असून भारतीय विद्युत अधिनियम 1885 चे कलम 10ड अनुसार व शासन आदेशाअन्वये महापारेषण कंपनीला पारेषण वाहिन्या व मनोर्‍याच्या उभारणी संबंधात अधिकार प्राप्त आहेत. सदर अधिकाराच्या वापर करत असताना झालेल्या नुकसानाबद्दल संबंधितांना पूर्ण नुकसान भरपाई अदा करण्याची तरतूद आहे.

सदर तरतुदीच्या अनुषंगाने अतिउच्च दाब मनोर्‍याने व्याप्त व वाहिनीच्या तारांखालील जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या जिल्ह्यात समिती स्थापन करावी त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांना अध्यक्ष उपअधीक्षक भूमि अभिलेख तालुका तसेच जिल्हा कृषी अधिकारी संबंधित पारेषण परवानाधारक कंपनीचे प्रतिनिधी यांना सदस्य म्हणून नेमण्यात आले आहे.

असे असताना धुरखेडा येथील शेतकरी जगन्नाथ पाटील व सौ.वंदना पाटील यांच्या जमिनीतून राज्य विद्यूत पारेषण कंपनीचा मनोरा उभारण्यात आला आहे. तसेच अति उच्च दाबाची पारेषण वाहिनीदेखील त्यांच्या शेतातून गेलेले आहे. सदर मनोरा उभारण्याकरिता पारेषण वाहिनीखालील जमिनीचे कोणतेही अधिग्रहण केलेले नाही. तसेच कोणतीही रक्कम जमीन अधिग्रहण केल्याबाबत शेतकर्‍यांना मिळालेले नाही. तसेच संबंधित अधिकार्‍यांकडून आजतागायत सदर शासन परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे शेत जमिनीत उभारण्यात आलेल्या मनोर्‍याची तसेच पारेषण वाहिनी खालील शेत जमिनीची मोजणी करण्यात आलेली नाही.

तसेच आजपर्यंत शासनाचे कोणतेही अधिकारी जागेवर येऊन पाहणी केलेली नाही. पारेषण वाहिनीखालील पिकांच्या वाहिनीमधून निघणार्‍या अतिउच्च दाबाच्या ऊर्जामुळे शेतकर्‍याच्या शेतातील उभे पिकांवर परिणाम होत असून केळी ऊस पपई कापूस मका यासारखे पिके नेहमी जळतात.

याबाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी शहादा, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धुळे यांना वेळोवेळी लेखी निवेदन पाठवूनसुद्धा दखल घेण्यात आलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत सदर शेतकर्‍याच्या शेतात केळीची बाग आहे. त्यावरील तारा खाली आल्याने केळीचे झाडे जळून खाक झाली. त्याबाबतदेखील तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्या तारेखालील शेतमजूर किंवा स्वतः शेतकरी उभा राहिला असता तर तोही जळून खाक झाला असता.

एवढा त्या अतिउच्च दाबाच्या तारांपासून शेतकर्‍यांना धोका असताना त्याची मूल्यमापन जे चेक द्वारे मिळाले त्या जमिनीच्या आकार प्रमाणे न मिळाल्यास तो मान्य नाही. शेतातील अतिउच्च दाबाच्या मनोरा व पारेषण वाहिनीचा मोबदला न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी जगन्नाथ केशव पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e