बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. भुसावळ बाजार समिती याठिकाणी भाजप शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे शेतकरी सहकारी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. दीड तासातच याठिकाणची मतमोजणी संपली आहे.
यात 18 पैकी जागांवर 15 जागांवर भाजपचे (BJP) आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहे. तर महाविकास आघाडीचे शेतकरी सहकारी पॅनलचे केवळ तीन जागांवर उमेदवार विजयी झाला असून महाविकास आघाडीच्या पॅनलचा या ठिकाणी पराभव झाला आहे.
भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व हे भाजपचे आमदार संजय सावकारे तर महाविकास आघाडीचे पॅनलचे नेतृत्व भुसावळ बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी तसेच एकनाथ खडसे करत होते . त्यामुळे भाजप शिंदे गटाने जळगाव जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये पहिलाच मोठा झटका दिला आहे.
0 Comments