वैभव झोटींग (रा. वागदा पुनर्वसन)मनीषा गायकवाड (रा. मायाबाई वॉर्ड आर्वी) या दोघांचे मागील साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मनीषा ही वर्धमनेरी येथे गेली होती. तिला परत आणण्यासाठी वैभव हा त्याच्या मित्रासोबत वर्धमनेरीला गेला होता. तेथून परत आर्वीला येत असताना दोघांत वाद झाला. दरम्यान रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत मनीषाने उडी घेतली तिला वाचविण्यासाठी वैभवनेही मनीषापाठोपाठ विहिरीत उडी घेतली.
मनीषाने विहिरीच्या काठाला घट्ट पकडून ठेवले होते. तिने आरडाओरड सुरु केली. दरम्यान परिसरातील नागरिकांना ही बाब दिसताच त्यांनी मनीषाला दोरखंडाच्या सहाय्याने विहिरीबाहेर सुखरुप काढले तर वैभव पाण्याबाहेर न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक आशिष गजभिये कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. दोन मोटारपंपाच्या सहाय्याने विहिरीत पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला असून वैभवचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती आशिष गजभिये यांनी दिली
प्रत्येकाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. रागाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम नाही. तसेच कोणताही निर्णय रागात घेऊ नये असं म्हणतात. मात्र तरुणीने रागाच्या भरात स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र यामध्ये तरुणालाच आपला जीव गमवावा लागला. वर्धामधील सदर घटनेमुळे परीसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत
0 Comments