इंदूर: पतीने ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास मनाई केल्याने पत्नीने थेट गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही घटना घडली आहे. पतीने पत्नीला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास मनाई केल्यामुळे तिने गळफास लावून घेतला. पतीला तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. त्यानंतर पतीने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब घेतले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
एअरोड्रम पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी उमाशंकर यादव यांनी याबाबत माहिती दिली की, ही घटना स्कीम क्रमांक-५१ ची आहे. येथे २८ एप्रिल रोजी एका महिलेने घरात गळफास घेतला होता. रीना असे या महिलेचे नाव आहे. तिचे वय ३४ वर्षे आहे. महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, तिला ब्युटी पार्लरमध्ये जायचे होते. पण, पतीने नकार दिल्याने तिने रागाच्या भरात गळफास लावून घेतला. यादव यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास करुन मृतदेह ताब्यात घेतला. सर्वांचे जबाब घेण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे
मृत महिलेचा विवाह १५ वर्षांपूर्वी इंदूर येथील बलराम याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. बलराम घरी टेलरिंगचे काम करतात. पती बलराम यादवने सांगितले की, पत्नी रीना ब्युटी पार्लरमध्ये जाण्यावरून वाद घालत होती. मी तिला नकार दिल्यावर तिने वाद घालायला सुरुवात केली. वाद झाल्यानंतर ती खोलीत गेली. थोड्या वेळाने मी तिला बघायला गेलो तर ती पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!
0 Comments