प्रसूतीदरम्यान ब्रेन हँब्रेज होऊन विवाहिता जायबंदी झाली, तसेच मुलगी झाल्याने पोलिस पती व कुटुंबीयांकडून सतत त्रास दिला जात असल्याची तक्रार शाहिनबी ऐनोद्दीन यांनी दिल्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे
मलिकनगरमधील माहेरवाशीन शाहीनबी एनोद्दीन शेख (वय २६) यांचा विवाह पोलिस कर्मचारी ऐनोद्दीन निजामुद्दीन शेख यांच्यासोबत २०१९ मध्ये झाला. लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली.शाहीनबी यांना मुलगी झाली. प्रसूतीदरम्यान त्यांना ब्रेन हँब्रेज होऊन त्या जायबंदी झाल्याने त्यांना नीट चालता येत नसल्याने पती ऐनोद्दीन, सासू सईदाबी, अश्रफ निजामुद्दीन यांनी टोमणे मारून भांडण उकरून काढून त्रास देण्यास सुरवात केली
अलीमुद्दीन शेख, तबस्सूमबी शेख, रईसाबी जब्बार खान, नाजनीनबी शेख, अनिसाबी शेख शकील यांनी छळ करून गांजपाट केला. याबाबत पीडितेने तक्रार दिल्यावरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस कर्मचारी नीलेश भावसार तपास करीत आहे.
0 Comments