पुण्यात डॉक्टरकडून रुग्ण महिलेवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे शहरातील कात्रज भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने रुग्ण महिलेवर अत्याचार केला असून पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांमध्ये पीडितेने तक्रार दिली आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी डॉक्टरचे कात्रज भागात क्लिनिक आहे. याठिकाणी पीडित रुग्ण महिला तपासणीसाठी गेली होती
याच वेळी त्यांची ओळख डाॅक्टरशी झाली. महिलेचा मोबाईल क्रमांक डॉक्टरने घेतला. त्यानंतर आरोपीने महिलेला पुन्हा रुग्णालयात बोलावले आणि धमकावून बलात्कार केला.
भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतलं आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e