२६ महिन्‍यांपासून वीजचोरी; २ लाख ३१ हजारांचा दंड करत पोलिसात गुन्‍हा दाखल

नंदुरबार जिल्ह्यात वीज चोरीचे प्रकरणात वाढ होत आहेत. असाच प्रकार  नवापूर शहरात घडला आहे. दोन लाखाहून अधिकची वीज चोरीची  घटना घडली असून थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
 नवापूर शहर इंद्रिस रज्जाक खाटीक याची इस्त्राईल ऑईल फॅक्टरी आहे. या ऑईल फॅक्टरीत गेल्या २६ महिन्यापासून वीज चोरी करून वापरत होते. एकूण २ लाख ३१ हजार ६४० रुपये किंमतीची १ लाख १० हजार ६४३ युनिटची वीज चोरीकेल्याचे आढळून आले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीज वसुली सुरू आहे. यासाठी भरारी पथक नेमण्यात आले असून या भरारी पथकाच्या लक्षात आल्यानंतर तपासणी केली असता गेल्या अनेक महिन्यापासून वीज चोरी होत असल्याचे लक्षात आले.

महावितरणकडून गुन्‍हा दाखल

इंद्रिस खाटीक यांच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखीन कुठे विच चोरी होत आहे का? यासाठी आता भरारी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे. यात जो कोणी आढळेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या इशारा देखील  महावितरण कंपनीकडून देण्यात आलेला आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e