नात्‍यातील मुलगा घरी आला अन्‌ केले घृणास्‍पद कृत्‍य; पीडिता दोन महिन्याची गर्भवती

बीडच्‍या अंबाजोगाई शहरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्राचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.  बीडच्या अंबाजोगाई शहरात घडलीय
 अंबाजोगाई येथे वास्‍तव्‍यास असलेल्‍या परिवाराच्‍या नात्यातील पुणे येथील युवक घरी आला व त्‍याची ओळख मुलीशी झाली. त्यातून त्‍याने मुलीला लग्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्‍यान घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत त्‍याने अत्याचार केला. ऋषी असे आरोपीचे नावं आहे. त्याचा शोध सुरु असून अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगी दोन महिन्‍याची गरोदर

सदर प्रकार समोर आल्‍यानंतर मुलीची तपासणी केली. यात पीडित मुलगी ही दोन महिन्याची गर्भवती असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e