गावांप्रमाणे आता पाड्यांवरही जलजीवनची कामे करणार : आदिवासी विकास मंत्री

नंदुरबार : गावांप्रमाणे आता पाड्यांवरही जलजीवन मिशनची कामे केली जाणार आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री ...

गावांप्रमाणे आता पाड्यांवरही जलजीवन मिशनची कामे केली जाणार आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आढावा बैठकीत बोलताना दिल्या. 

जलजीवन मिशन आणि घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन संदर्भात आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. जलजीवन मिशनच्या माध्यमातून गाव, पाडा, मनुष्यनिहाय नियोजन करण्याची ही आगळी-वेगळी योजना असून, येणाऱ्या ३० वर्षांसाठी पेयजलाची ही शाश्वत स्वरूपाची योजना आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या २,५९३ योजनांना मंजुरी घेण्यात आली असून, त्यातील ७३३ योजनांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

अक्राणी तालुक्यात ९५३ योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यात ९३१ योजना, नंदुरबार तालुक्यात ८९ योजना, नवापूर तालुक्यात ३१४, शहादा तालुक्यात १७९,  तळोदा तालुक्यात ११७ योजनांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e