पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली आहे.
पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती टळली आहे. जमावाने घेराव घातलेल्या दोन साधूंची पोलिसांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे गडचिंचले हत्याकांडाची पुनरावृत्ती होता होता टळली.
पालघरच्या वाणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत चंद्रनगर भागात दोन साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते, मात्र हे साधू चोर असल्याच्या अफवेनंतर दोन्ही साधूंना परिसरातील काही नागरिकांनी घेराव घातला. ही बाब पोलीस प्रशासनाच्या लक्षात येताच तातडीने वाणगाव पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमलेल्या जमावाची समजूत काढली
पोलिसांनी या दोन्ही साधूंची घटनास्थळावरून सुखरूप सुटका केली. पालघर जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या गडचिंचलेमधल्या साधू हत्याकांडानंतर पोलिसांनी जनसंवाद अभियान सुरू केलं. या अभियानाअंतर्गत गावागावात जाऊन पालघर पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते. या अभियानामुळे नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीसही वेळेत तिकडे दाखल झाले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे.
0 Comments