संजय शिरसाट अडचणीत! 'ते' वक्तव्य भोवणार; सुषमा अंधारेंनी ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

शिवसेना ठाकरे गटाच्या उपमनेत्या सुषमा अंधारेंनी आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय शिरसाट यांच्याविरोधात त्यांनी पोलिसांत धाव घेतली असून त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सुषमा अंधारे संजय शिरसाट यांच्यावर केवळ तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सभेत सुषमा अंधारे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याआधी त्यांनी महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज त्यांनी तीन रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी "विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकही जिल्ह्यात तक्रार दाखल झाली नाही, असा आरोप यावेळी केला. तसेच अमृता फडणवीस यांच्या सांगितलेल्या माहितीवरुन तक्रार दाखल होते. शीतल म्हात्रे प्रकरणात लोकांना उचलले जाते, मात्र आमची तक्रारही दाखल केली जात नाही," अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली..

एकीकडे संजय शिरसाट यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जात असतानाच त्यांनी मात्र "सुषमा अंधारेंबद्दल एकही शब्द 'अश्लील' बोलल्याचा दाखवा, मी तात्काळ राजीनामा देतो," असा खुलासा केला आहे. माझ्यासाठी सत्ता महत्वाची नाही. मी चुकीचे काहीही बोललो असल्याचं सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत..


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e