नाशिक च्या समतानगर परिसरातून अपोलो कंपनीच्या टायर भरलेल्या आयशरमधून चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेत चोरट्यांनी अपोलो कंपनीचे टायर चोरून नेले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त बतमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस नी संशयित दर्शन उर्फ ओंकार सुर्यवंशी आणि विशाल प्रदीप गांगुर्डे यांना ताब्यात घेतले.
दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत
यानंतर त्यांची चौकशी केली असता दर्शन उर्फ ओंकार रवींद्र सूर्यवंशी याने त्याच्याकडे असलेल्या छोटा हत्तीमधून विशाल प्रदीप गांगुर्डे यासोबत ही चोरी केल्याचे कबुल केले. यात पोलिसांनी गाडी चोरी गेलेले १३ अपोलो कंपनीचे टायर ९ ट्यूब असा १ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. संशयित दर्शन उर्फ ओंकार सूर्यवंशी व विशाल प्रदीप गांगुर्डे यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास उपनगर पोलीस करत आहे
0 Comments