गर्लफ्रेंडला भेटायला पुण्याला, मात्र तिच्याच मैत्रिणीला पाहून नियत फिरली, तरुणीचा विनयभंग

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत आहे. त्यातल्या त्या गुन्हेगारीचं प्रमाण पुण्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशीच एक संतापजनक घटना मुंढव्यातील केशवनगर येथे उघडकीस आली आहे.

पुण्यामधील मुंढव्यातील केशवनगर भागात मैत्रिणीसोबत राहणाऱ्या एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. सोबत राहणाऱ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड तिला भेटायला मुंबईहून पुण्यात आला. मात्र, त्याने गर्लफ्रेंड ऐवजी तिच्या मैत्रिणीबरोबरच अश्लिल वर्तन करुन विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
२७ वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अजिंक्य रमेश सावंत (वय २६, रा. मेघवाडी, लालबाग, लोअर परळ, मुंबई) नामक तरुणाला अटक केली आहे. फिर्यादी आणि तिच्या दोन मैत्रिणी खराडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. तिघींनी मुंढव्यातील केशवनगर परिसरातील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्वावर घेतली आहे. आरोपी अजिंक्य सावंतचे तक्रारदार तरुणीच्या एका मैत्रिणीशी प्रेमसंबंध आहेत. तिला भेटण्यासाठी तो मुंबईहून पुण्याला आला होता.
तक्रारदार तरुणी सकाळी गाढ झोपेत होती. त्या वेळी अजिंक्यने तरुणीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार तरुणी गाढ झोपेत होती तेव्हा अजिंक्य हा नग्न अवस्थेत फिर्यादीच्या समोर जाऊन उभा राहिला. फिर्यादी यांना स्पर्श करुन फिर्यादीच्या खांद्याला आणि हाताला पकडून त्यांच्या अंगावर पडला. त्याला फिर्यादी यांच्या मैत्रिणीने विरोध केल्यावर तिला मारहाण केली. त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळवली. आरोपी अजिंक्यला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पोलीस उपनिरीक्षक गाडे पुढील तपास करत आहेत

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e