लिंबू अंगाऱ्याने उपचार बरा, पुरुष महिलांची दरबारात झुंबड, ७ मृत्यूंमागची वेदनादायी कहाणी

अतुल श्रीराम आसरे (वय ३२ वर्ष, बाभूळगाव जि. अकोला), विश्वनाथ तायडे (वय ३५ वर्ष, सोनखेड), पार्वताबाई महादेव सुशीर (वय ६५ वर्ष भालेगाव बाजार, खामगाव), मुरलीधर बळंवत अंबरखाने (वय ५५. पारस), भास्कर आंबीलकर (वय ६० वर्ष अकोला), उमा महेंद्र खारोडे (वय ५० वर्ष, भुसावळ), सुभाष समाधान मस्के (वय ४५), अशी मृत व्यक्तींची नावं आहेत

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील पारस इथे काल बाबूजी महाराज संस्थानमध्ये अतिशय दुख:द घटना घडली आहे. संस्थान परिसरात असलेल्या पत्र्याच्या शेडवर दीडशे वर्षांपूर्वीचं कडुनिंबाचे झाड कोसळल्यानं ७ लोकांचा मृत्यू झाला आहे तर २८ पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. काल अचानक झालेल्या वादळी पावसामुळे हे वृक्ष कोसळल्याचं प्रशासन सांगते. ही घटना महाराष्ट्राला सुन्न करणारी आहे. अकोल्याच्या पारसमधील बाबूजी महाराज संस्थान मंदिरात झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्या सात लोकांच्या मृत्यूला अघोरी उपचार जबाबदार आहे, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे
राज्यभरातून या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळलेले असलेले लोक दर रविवारी इथे येत असतात. काल रविवारी इथे दिवसभर राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक उपचारासाठी आले होते, त्यांच्यावर लिंबू-अंगारा देऊन उपचार सुरू होता. म्हणजेच लिंबू डोळ्यात टाकून अघोरी उपचार केले जात होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. संस्थांचे अध्यक्ष मोतीराम इंगळे यांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केलेली आहे.
घटनेनंतर म्हणजेच याविषयी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष शरद वानखडे यांनी म्हटले आहे की, काल पारस इथे घडलेली घटना अतिशय दुख:द आहे. या घटनेत बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पारस येथे जे बळी गेले ते अंधश्रद्धेतून गेले. सर्दीपासून कॅन्सरपर्यंत इथे रोगावर उपचार होतो, असा दावा संस्थानाचा आहे. चक्क लोकांच्या डोळ्यात लिंबू टाकून तसेच अंगारा देऊन लोकांवर उपचार होतात. याशिवाय अंगाऱ्याने आंघोळही घातली जात होती. पुरोगामी महाराष्ट्रात काय चाललंय? असा सवाल अंनिसने केला
अंनिस आक्रमक

दर रविवारी इथे दरबार भरत होता, तो दरबार नेमका कशासाठी भरत होता? त्या दरबारमध्ये काय घडतं होतं? कुठल्या प्रकारचे कृत्य घडवून कशाप्रकारे उपचार सुरू होते, जर अशा प्रकारचे अघोरी उपचार घडत असतील तर प्रशासनाने या प्रकरणात सखोल चौकशी करावी, अशी मागणी अंनिसने केली आहे. तसेच जादूटोणा अघोरी उपचार केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही अंनिसने केली आहे.
अब्दुल सत्तारांसह महाजनांनी घेतल्या रुग्णांच्या भेटी

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कालच्या पारसमधील दुर्घटनेतल्या जखमींची आज अकोला जिल्हा रूग्णालयात भेट घेतली आहे. तसेच मृतकांच्या वारसांना आणि जखमींना शासनाकडून मदत देय ठरली असल्याचे ते म्हणाले. तसेच पारस येथील घटना अतिशय दुःखद अन् मनाला वेदना देणारी आहे, असेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी अकोल्याचे शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी रुग्णांना भेटी घेतल्या.

याशिवाय मंत्री गिरीश महाजन यांना देखील या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अकोला शासकीय रुग्णालय गाठत रुग्णांच्या भेटी घेतल्या. दरम्यान मृत व्यक्तीसाठी ४ लाख रुपयांची मदत देय ठरली होती, आता ही रक्कम वाढवून पाच लाखांवर करण्यात आली आहे. तसेच ४० ते ६० टक्के अपंगत्व ७४ हजार मदत देय आहे. ६० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व २ लक्ष ५० हजार मदत देय आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त रुग्णालयात असल्यास १६ हजार रुपयांची मदत देय राहणार आहे. एक आठवड्यापेक्षा कमी रुग्णालयात असल्यास ५ हजार ४०० रुपयांची मदत देय असणार आहे, असेही महाजन म्हणाले.
काय घडलं होतं काल?

अकोल्यातील पारस इथे बाबूजी महाराज संस्थान म्हणजेच मंदिर आहे. काल रविवार असल्याने या ठिकाणी आरतीसाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी राहते. संस्थान परिसरात काल सायंकाळी साडे सातच्या सुमारास आरती सुरू झाली. या मंदिराबाहेर टिनाचं मोठे शेड आहे, त्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि पारस परिसरातील पाऊस सुरू झाला. रस्त्यावरील येजा करणारे लोकांनी पावसापासून बचाव व्हावा, म्हणून टिन शेडचा आसारा घेतला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e