वॉचमनच निघाला सळई चोर साथीदारासह केले जेरबंद: वाहनासह तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत: शिरपूर शहर पोलिसांची कामगिरी

आमोदे (ता. शिरपूर) शिवारातील लोखंडी सळई चोरीचा गुन्हा  शिरपूर शहर पोलिसांच्या  डी.बी. पथकाने उघडकीस आणला असून या गुन्ह्यात वॉचमनच चोर निघाला. त्यांच्यासह साथीदाराला जेरबंद केले असून त्यांच्याकडून टेम्पो वाहनासह 3 लाख 12 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अनिल खंडुसिंग राजपूत (वय 51 रा. रथ गल्ली, शिरपूर) यांचे आमोदे शिवारातील प्लॉट नं. 15- अ.15 येथे बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी बनविलेल्या पत्र्याचे शेडमधून अज्ञात चोरट्याने 48 हजारांचे लोखंडी सळई, सळई कापण्याचे लहान मशीन व भारत गॅस कंपनीचे एक गॅस सिलेंडर चोरून नेले. ही चोरीची घटना दि.12 ते 13 एप्रिलदरम्यान घडली. याप्रकरणी राजपुत यांच्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांनी डी. बी. पथकाच्या पोलीस अंमलदारांमार्फत तपासचक्रे फिरवून फिर्यादीचा वॉचमन अविनाश सुरेश मालचे (रा.आमोदे ता.शिरपूर) याला शिताफिने ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा माल पंकज मंगल भिल याने त्याचा निळ्या रंगाच्या टेम्पोमध्ये (क्र एम.एच. 01/ बी. आर. 0588) भरून नेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर साथीदार पंकज भिल यास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन 12 हजार 500 रूपये किंमतीच्या लोखंडी सळई व 3 लाखांचा टेम्पो असा एकुण 3 लाख 12 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या गुन्ह्यात अविनाश सुरेश मालचे (वय 19) व पंकज मंगल भिल (वय 22 रा. आमोदे ता. शिरपूर) यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोना मनोज पाटील हे करीत असुन या गुन्ह्यात आणखी इतर आरोपी निष्पन्न झाले असुन त्यांचाही शोध सुरु करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. उपविभागीय पोलिस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर पोउनि संदिप मुरकुटे, गणेश फुटे तसेच डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, लादूराम चौधरी, बालमुकुंद दुसाने, पोना मनोज पाटील, पंकज पाटील, रविंद्र आखडमल, अनिल जाधव, पोकाँ विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रविण गोसावी, सचिन वाघ, भटू साळुंके, आरिफ तडवी, विलास कोळी, विवेकानंदन जाधव तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व पारधी यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e