शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत 19 अर्ज माघारी, 37 उमेदवार रिंगणात

येथील बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीत माघारीच्या अंतिम मुदतीत गुरुवारी (ता. २०) १९ इच्छुकांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ३७ उमेदवार रिंगणात आहेत
संपूर्ण निवडणूक किंवा संचालकपदाच्या बहुतांश जागा बिनविरोध होतील अशी अटकळ बांधली जात असताना महाविकास आघाडी व त्यांच्यासोबत एकवटलेल्या संघटनांनी अखेरपर्यंत प्रयत्न करून एकही जागा बिनविरोध होऊ दिली नाही. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होईल हे स्पष्ट झाले.या निवडणुकीत ६१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात काहींनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले. मात्र त्यांचा एकच अर्ज स्वीकारार्ह ठरला. त्यामुळे १८ जागांसाठी ३७ उमेदवार असे निवडणुकीचे चित्र असून, सरळ लढत होणार आहे.मतदारसंघनिहाय निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या अशी ःसोसायटी मतदारसंघ : सर्वसाधारण (सात जागा) : एकूण दाखल अर्ज १९, माघारी अर्ज पाच, शिल्लक १४. महिला राखीव (दोन जागा) : दाखल अर्ज चार, माघारी अर्ज शून्य, शिल्लक चार. इतर मागासवर्ग (एक जागा) : दाखल अर्ज तीन, माघारी अर्ज एक, शिल्लक दोन. अनुसूचित जमाती (एक जागा) : दाखल अर्ज पाच, माघारी अर्ज तीन, शिल्लक दोन
ग्रामपंचायत मतदारसंघ : सर्वसाधारण (दोन जागा) : एकूण दाखल अर्ज चार, माघारी अर्ज एक, शिल्लक तीन. अनुसूचित जाती-जमाती (एक जागा) : दाखल अर्ज पाच, माघारी अर्ज तीन, शिल्लक दोन. आर्थिक दुर्बल घटक : दाखल अर्ज पाच, माघारी अर्ज तीन, शिल्लक दोन. व्यापारी व अडते मतदारसंघ (दोन जागा) : दाखल अर्ज (सहा उमेदवारांचे) १०, माघारी अर्ज एक, शिल्लक पाच अर्ज. हमाल-मापाडी मतदारसंघ (एक जागा) : दाखल अर्ज (पाच उमेदवारांचे) सहा, माघारी अर्ज दोन, शिल्लक तीन.आज चिन्हवाटपनिवडणूक कार्यक्रमानुसार, शुक्रवारी (ता. २१) निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या मतदारसंघ (एक जागा) : दाखल अर्ज (पाच उमेदवारांचे) सहा, माघारी अर्ज दोन, शिल्लक तीन.आज चिन्हवाटपनिवडणूक कार्यक्रमानुसार, शुक्रवारी (ता. २१) निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे. या निवडणुकीत दोन्ही पॅनलतर्फे विविध चिन्हांची मागणी करण्यात आली आहे. काही उमेदवारांनी आपल्या प्रचलित नावाचा उल्लेख मतपत्रिकेवर करावा, अशी मागणीही नोंदविली. निवडणूक अधिकारी व्ही. बी. पापुलवार त्यावर कोणती भूमिका घेतात त्याचा उलगडा होणार आहे 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e