दोंडाईचात आयपीएल सट्ट्याचा डाव उधळला; माजी नगरसेवक ताब्यात

आयपीएलच्या सामन्यादरम्यान दोंडाईचासह परिसरातील मुलांना मोबाईलवरून सट्ट्याच्या नादी लावणाऱ्या संशयित चौघांना दोंडाईचा पोलिसांनी अटक केली.
दोंडाईचा येथील बसस्थानकाजवळील हॉटेल गोपालमधील रूम नंबर २०१ मध्ये पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने छापा टाकून संशयितांचा हा डाव उधळला. घटनास्थळी आढळलेल्या ९१ हजारांच्या मुद्देमालसह पोलिसांनी माजी नगरसेवक नंदू सोनवणे, संभाजी पाटील, अतुल पाटील यांना अटक केली.दोंडाईचाचे पोलिस निरीक्षक पवार यांना माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक दिनेश मोरे, उपनिरीक्षक शरद लेंडे व हवालदार प्रेमराज पाटील, राजेंद्र सोनवणे हे हॉटेल गोपालमध्ये दाखल झाले
या छाप्यात त्यांनी मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाइट रायडर्स या दोन संघांदरम्यान होणाऱ्या २०-२० आयपीएल किक्रेटवर सट्टा खेळणाऱ्यांना मोबाईलद्वारे माहिती देणे व सबंधितांकडून स्वत:च्या फायद्यासाठी जुगार खेळताना तसेच माहिती एका पांढऱ्या रंगाच्या चिठ्ठीवर नोंदवत असताना संशयित चौघांना ताब्यात घेतले. जुगार साहित्यासह सुमारे ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e