बाबरीचा ढाचा आम्ही पाडला हे म्हणण्याचं धैर्य भाजपमध्ये नव्हतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
बाबरी पाडण्यात शिवेसेनेची बाळासाहेब ठाकरेंची भूमिका नव्हती' या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका होती. चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. शिवसेना शिंदे गटानेही यावरुन भाजपला सुनावलं. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली आहे.
बाबरी मस्जिद बाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली आहे. राम जन्मभूमी आंदोलनात किती शिवसैनिक होते हा विचार करण्यासारखा विषय असून बाबरीचा ढाचा आम्ही पाडला हे म्हणण्याचं धैर्य भाजपमध्ये नव्हतं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी होय शिवसैनिकांनी बाबरी पाडली, अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान बाबरी मज्जिदच्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. त्यावेळी 15 दिवस तुरुंगवासासह पोलिसांकडून मला मारहाण देखील झाली असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, 'बाळासाहेबांबाबत माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यांच्या अनादराचं पाप आम्ही करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतील हिंदू जिवंत आहेत. बाबरी ही हिंदूंनी पाडली आणि त्याचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेनं केलं होतं. कोणत्याही एका पक्षाने पाडला नाही' असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, माझा थेट प्रश्न होता की संजय राऊत कुठे होते? बाळासाहेबांबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही. मुंबईत दंगली व्हायच्या तेव्हा जवळून बाळासाहेबांना पाहिलं. अयोध्येत बाबरी मशिद पाडताना शिवसैनिक होते की नव्हते. माझा प्रश्न संजय राऊत कुठे होते हा आहे.
पाटलांच्या विधानावरून युतीमध्ये तणाव
'चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहे आणि आमचे सहकारी आहेत. पण त्यांच्या वक्तव्यांनी आम्ही सहमत नाही. वंदनीय बाळासाहेब तिथे नव्हते हे सांगणे योग्य नाही. चंद्रकांत पाटील यांनी माहिती घ्यायला हवी, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. बाबरी पाडण्यात आली तेव्हा तिथे शिवसैनिक नव्हते, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याविधानामुळे वाद पेटला आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
0 Comments