शिरपूर, साक्री तालुक्यातील पर्यटन, तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी मंजूर

तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास योजनेंतर्गत भाविकांच्या सुविधांसाठी शिरपूर तालुक्यासाठी ४.५० कोटी आणि साक्री तालुक्यासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत खासदार डॉ. हीना गावित या शिरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना आमोदे येथील कार्यक्रमात तालुक्यातील वारकरी तसेच भाविकांनी डॉ. गावित यांची भेट घेऊन शिरपूर तालुक्यातील जुन्या तीर्थक्षेत्रांना

तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास योजनेंतर्गत भाविकांच्या सुविधांसाठी शिरपूर तालुक्यासाठी ४.५० कोटी आणि साक्री तालुक्यासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२२-२३ अंतर्गत खासदार डॉ. हीना गावित या शिरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना आमोदे येथील कार्यक्रमात तालुक्यातील वारकरी तसेच भाविकांनी डॉ. गावित यांची भेट घेऊन शिरपूर तालुक्यातील जुन्या तीर्थक्षेत्रांना मूलभूत सुविधा कमी असल्याची माहिती दिली होती.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनीही तालुक्यातील अनेक मंदिरांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणी केली होती. या मागण्यांचा गावित यांनी पाठपुरावा केला. या पार्श्वभूमीवर जवळपास ११ पर्यटन,तीर्थक्षेत्र स्थळांसाठी एकूण ४.३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. एवढेच नव्हे तर, या कामांसाठी २.१६ कोटी रुपयांचा निधी धुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वितरीतही झाला आहे. दोन पर्यटन, तीर्थक्षेत्र स्थळांसाठी एकूण ६४ लाख रुपये मंजूर झाले असून कामांसाठी १२.८० लाख निधी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना वितरीत झाला असल्याची माहिती पत्रकातून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e