नांदेड हादरलं! मित्र-मैत्रिणीला चोरट्याने अडवलं, मैत्रिणीला छेडताना थांबवताच धाड.. धाड.. धाड...

नांदेडमध्ये पुन्हा गोळीबाराची मोठी घटना घडली आहे. यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी एका प्रेमीयुगुलावर गोळीबार करण्यात आला. यात तरुण जखमी झाला.

शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. गोळीबार, लुटमार, छेडछाड, दरोडा, चेन स्नॅचिंग यासारख्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सोमवारी रात्री नांदेड शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं. रस्त्यावरून जात असलेल्या प्रेमीयुगुलाला अडवून एका दरोडेखोराने गोळीबार केला. यात प्रियकराला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शुभम दत्तात्रय पवार हा सोमवारी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीने आपल्या मैत्रिणी सोबत विष्णुपुरी परिसरातील पांगरा मार्गावरील फायबर बटकडे जात होता. फायबर बटजवळ येताच अंधारात लपून बसलेला एक दरोडेखोर तिथे आला. त्यानंतर आरोपीने बंदूकीचा धाक दाखवून प्रियकराच्या जवळील चेन आणि पैसे बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर तो नराधम शुभमच्या मैत्रिणी सोबत अभद्र व्यवहार करत होता. तेव्हा शुभम पवार याने विरोध केला. यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटी दरम्यान दरोडेखोराने शुभम पवार याच्यावर गोळी झाडली. ती गोळी शुभमच्या बरगडीत लागली.
गोळीबारत जखमी होऊन रक्तबंबाळ झालेल्या शुभमला नागरिकांनी विष्णुपुऱी येथील शासकीय रुग्णालात दाखल केलं. दरम्यान गोळीबाराची घटना घडल्यानंतर ग्रामीण पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला. या फरार आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
नांदेडच्या तरुणानं खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंबाची बाग, पहिल्याच वर्षी २५-३० लाखांचं उत्पन्न मिळण्याची आशा

निर्मनुष्य ठिकाण हे प्रेमीयुगुलाचे आवडते ठिकाण बनत चालले आहे. एकांतवास मिळावा यासाठी प्रेमीयुगुल निर्जनस्थळाचा शोध घेत असतात. मात्र अशा निर्मनुष्य ठिकाणावर गुन्हेगारांचाही वावर असतो आणि हे गुन्हेगार अशा ठिकाणी नजर ठेवून असतात. संधीचा फायदा घेत गुन्हेगाराकडून प्रेमीयुगुलाला टार्गेट केलं जात आहे. या पूर्वीही अशाच प्रकारे अनेक घटना नांदेडमध्ये घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नागरिकांमधील भीती दूर करून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे. यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e