डॉ. वैशाली पाटीलकडे मिळाले 81 तोळे सोने

आरोग्य सेवकाचे मासिक वेतन काढण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्या बँकेच्या लॉकर आणि घरातून तब्बल ८१ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे
दरम्यान, आज पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.बुधवारी (ता. १७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सदरील कारवाई केली होती. वैद्यकीय रजेवर गेलेला आरोग्यसेवक पुन्हा सेवेत रुजू झाला. त्यानंतरही वैशाली पाटील यांनी तक्रारदार आरोग्यसेवकाचे वेतन काढले नाही.त्यामुळे त्याने वेतनाची मागणी केली असता, पाटील यांनी दोन आरोग्यसेवकांच्या माध्यमातून तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती
१० हजारांवर तडजोड झाल्यानंतर ती रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली पाटील हिच्यासह संजय रामू राव (४६), कैलास गंगाधर शिंदे (४७) यांना अटक केली होती.दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली पाटील यांच्या घराची झडती घेतली असता घरातून १० तोळे सोने जप्त केले होते. तसेच, बँकेच्या लॉकरची माहिती मिळाली होती. सदरील लॉकर्समधूनही ७१ तोळे सोने असे, ८१ तोळे सोन्याचे घबाडच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे.तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांची नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e