आमचं लग्न लावून द्या! विष पिऊन कपल पोलीस ठाण्यात पोहोचलं; पोलिसांनी हॉस्पिटलात नेलं, पण...

कुटुंबियांचा विरोध असल्यानं प्रेमी युगुलानं विष प्राशन केलं. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणं गाठलं आणि लग्न लावून देण्याची विनंती केली. पोलिसांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.
भोपाळ: मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक प्रेमी युगुल विष प्राशन करुन पोलीस ठाण्यात पोहोचलं. त्या दोघांना लग्न करायचं होतं. त्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत मागितली. दोघांनी विष प्राशन केल्याचं समजताच पोलिसांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात दिले. खरगोन जिल्ह्यातील कसरावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. परिसरातील एका तरुणाचे तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघे विष पिऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी लग्नासाठी पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथमोपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र आयसीयू वॉर्डमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
२१ वर्षांची प्रिती भालसे आणि २६ वर्षांच्या यशवंत वाघदरे यांचे प्रेमसंबंध होते. कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्यानं दोघे किटकनाशक प्यायले. यानंतर दोघांनी पोलीस ठाणं गाठलं. त्यांनी पोलिसांपुढे आपबिती मांडली. 'आमचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे आमचं लग्न लावून द्या. आम्हाला मदत करा,' असं म्हणत त्यांनी पोलिसांकडे सहाय्य मागितलं. आपण किटकनाशक प्राशन केल्याचंही दोघांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.
डॉक्टरांनी शवविच्छेदन करुन दोघांचे मृतदेह ग्रामस्थांच्या ताब्यात दिले. प्रिती आणि यशवंतचे आई, वडील, नातेवाईक रुग्णालयात पोहोचले नाहीत. प्रिती माकडखेडा परिसरात वास्तव्यास होती. अजयचे मामादेखील तिथेच राहतात. अजय मामांकडेच राहायचा. गुरुवारी रात्री दोघे सोबतच होते. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास दोघे पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e