दोन आठवड्यापूर्वी अपहरण झालेल्या मुलाचा शोध पोलिसांना लागेना

मुंढवागाव येथील कामगार मैदानाजवळ राहणाऱ्या एका मुलाचे २८ एप्रिल रोजी अपहरण झाले. तो मुंढवा येथील लोणकर माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी शिक्षण घेत होता.
मुंढवागाव परिसरातून एका १७ वर्षीय मुलाचे दोन आठवड्यापूर्वी अपहरण झाले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. परंतु मुंढवा पोलिसांना अपहरण झालेल्या मुलाचा अद्याप शोध घेता आलेला नाही.
मुंढवागाव येथील कामगार मैदानाजवळ राहणाऱ्या एका मुलाचे २८ एप्रिल रोजी अपहरण झाले. तो मुंढवा येथील लोणकर माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी शिक्षण घेत होता. याबाबत मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अपहरण झालेल्या या मुलाचा मुंढवा पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही.मुंढवा परिसरात ३० एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक रवींद्र गायकवाड यांचा खून झाला होता. काही मुलांनी गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले होते. याबाबत मुंढवा-केशवनगर परिसरातील नागरिकांनी एक मे रोजी परिसरात कडकडीत बंद ठेवला. तसेच, मुंढवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेत निषेध केला होता.मुंढवा पोलिसांनी रवींद्र गायकवाड यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केली. मात्र, या घटनेनंतर लोणकर चौकात गुन्हेगारांनी एका पान टपरीचालकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. आता मुलाचे अपहरण होऊन दोन आठवडे उलटूनही त्याचा शोध लागलेला नाही.
अपहरण झालेला मुलगा मित्रांसोबत भीमनगर कॅनॉल परिसरात पोहण्यासाठी गेला होता. मुलाचा कॅनॉलमध्ये यवतपर्यंत शोध घेतला. परंतु मुलाचा शोध लागलेला नाही. पोलिस त्या मुलाचा शोध घेत आहेत. या प्रकरणी एकाला अटक केली असून, अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.- अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e