शस्त्रांस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीच्या रामानंद नगर पोलीसांच्या पथकाने शिवकॉलनी परिरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, चॉपर, गुप्ती, दोर मिरचीपुड असे साहित्य हस्तगत करुन टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी रविवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवकॉलनी परिसरात असलेल्या प्रतीक पार्क आपार्टमेंटजवळ रविवारी सायंकाळी 5 वाजता दरोड्याचा प्रयत्न असलेली टोळीच्या रामानंदनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या.
संशयित खुशाल विनोद पांडे, नागेश प्रल्हाद सोनार, मयूर उर्फ विकी दीपक अलोने, दुर्गेश उर्फ पपई आत्माराम संन्याशी आणि वसीम हुसेन पटेल सर्व रा. जळगाव यांना ताब्यात घेत तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणले. पोकॉ रवींद्र चौधरी यांनी दिलेले फिर्यादीवरून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.
पथकाची कारवाई
0 Comments