ज्ञानेश्वर जगन्नाथ पाटील (वय 47) असे जखमी माजी सरपंचाचे नाव आहे. याबाबत त्यांनी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांना दि.1 रोजी सांयकाळी आठ वाजेच्या सुमारास दहा संशयित तरुणांनी हातात काठ्या-लाठ्या घेऊन मारहाण केली. त्यातील एकाने चाकू हल्ला चढविला. त्यात पाटील यांच्या डाव्या गालावर गंभीर दुखापत झाली. .
काही ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर पाटील यांना सोडवत दोंडाईचा शहरातील एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविले. रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती कळताच जि.प. भाजपाचे गटनेते कामराज निकम हे रुग्णालयात दाखल झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील, चालक नरेंद्र शिरसाट हे घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी दहा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद लेंडे करीत आहे. संशयितांची धरपकड सुरू झाली आहे. यात एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले
0 Comments