कोळदे येथे अज्ञात महिलेचा धारदार शस्त्राने खून

तालुक्यातील कोळदा येथे 30 वर्षीय अज्ञात महिलेचा धारदार कटरच्या साहयाने खून झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजेपुर्वी कोळदा (ता.नंदुरबार) शिवारातील नरोत्तम मुरार पाटील यांच्या गट क्र 138 या बाजरीच्या शेतात एका अनोळखी 30 ते 35 वर्ष वयाच्या महिलेस कोणीतरी अज्ञात आरोपीताने अज्ञात कारणावरुन धारदार कटरचे सहाय्याने वार करुन जिवे ठार मारल्याची घटना घडली.

याबाबत ईश्वर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e