अल्पवयीन मुलगी रात्री उशीरा घरी आली, मध्यरात्री पोटात भयंकर वेदना, डॉक्टरकडे नेताच आई हादरली

नागपुरात एक अल्पवयीन विद्यार्थिनी रात्री उशिरा घरी पोहोचली. आईने विचारलं तर म्हणाली की मैत्रिणीकडे होती. मध्यरात्री पोटात भयंकर वेदना होऊ लागल्याने आईला संशय आला. डॉक्टरकडे नेताच धक्कादायक सत्य समोर आलं
इंस्टाग्रामवरून ओळखी झालेल्या मित्रानेच दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. घरी गेल्यानंतर पोटात दुखत असल्याची तक्रार विद्यार्थिनीने केल्यानंतर आईच्या सतर्कतेमुळे हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपी निखिल ऊर्फ आकाश विजय शर्मा (२२ अजनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. तिला इंस्टाग्रामवर व्हिडिओ तयार करण्याची सवय आहे
इंस्टाग्रामवरच तिची निखिल शर्माशी ओळख झाली. तो दहावीपर्यंत शिकला असून सध्या बेरोजगार आहे. दोघांमध्ये काही दिवस इंस्टाग्रामवर संवाद सुरु होता. त्यानंतर दोघांच्या भेटी होऊ लागल्या. निखिल हा तिच्यासोबत शाळेपर्यंत जायला लागला. निखिलने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला तो शाळेत न जाता फिरायला जाण्यासाठी तगादा लावत होता.
११ मे रोजी रात्री साडेआठ वाजता विद्यार्थिनी ही सायकलने घरी जात होती. निखिलने तिला फिरायला जाण्यासाठी पुन्हा तगादा लावला. तिनेही होकार दिला. त्याने तिला थेट तिला स्वत:च्या घरी नेले. घरी कुणीही नसल्याची संधी साधून त्याने मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
रात्री दहा वाजता मुलगी घरी गेली. तिने मैत्रिणीकडे गेल्याचा बहाणा सांगितला. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास पोट दुखत असल्याची तक्रार तिने आईकडे केली. आईने थोडा धीर दिला. तिची अवस्था बघून काहीतरी विपरीत घडलं असल्याचे आईच्या लक्षात आले. आईने तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
तिची प्रकृती बिघडल्यामुळे सकाळी तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून निखिल शर्माला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e