मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.१३ मे रोजी दुपारी ही कारवाई केली. शहरातील रिध्दीसिध्दी मंगल कार्यालय नालंदा हॉटेलच्या शेजारी असलेल्या शेतातील पोल्ट्री फार्मवर पथकाने अचानक छापा टाकला. तेथे विनोद रामचंद्र गाबडा (वय ६६ रा.मिशन कंपाऊंड, मोगलाई,साक्री रोड धुळे), ललित भिकन माळी (वय १९ रा.देविदास कॉलनी जुने धुळे ), दर्शन संजय चौधरी (वय २४ रा.सुपडूआप्पा कॉलनी जुने धुळे) हे तिघे मानवी जिवितास हानीकारक असलेली बनावट देशी दारु बनवितांना रंगेहात सापडले. त्यांच्याकडून दारुसाठा, दारु बनविण्याच्या साहित्यासह एकूण १ लाख ५४ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा पोल्ट्री फार्म धिरज कैलास माळी (वय २३ रा.प्लॉट नंबर ३५, सुपडूआप्पा कॉलनी जुने धुळे), याच्या मालकीचा असून त्याने तो दर्शन चौधरी यास भाडेतत्वावर दिला होता, असेही चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे
0 Comments