प्रवीण सूद यांच्या नावावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरीही उपस्थित होते. यानंतर त्यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. चौधरी यांनी सूद यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
कोण आहेत प्रवीण सूद?
प्रवीण सूद यांचा जन्म 1964 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये झाला. त्यांनी आयआयटी दिल्लीतून पदवी प्राप्त केली आहे. ते 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या कर्नाटकचे पोलीस महासंचालक आहेत. 1989 मध्ये ते म्हैसूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक झाले. यानंतर बेल्लारी आणि रायचूरचे पोलिस अधीक्षकही ते होते. त्यानंतर बेंगळुरूचे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून काम केले.
राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस पदक प्रदान
प्रवीण सूद हे 1999 मध्ये मॉरिशसमध्ये पोलिस सल्लागारही होते. 2004 ते 2007 पर्यंत ते म्हैसूर शहराचे पोलीस आयुक्त होते. त्यानंतर 2011 पर्यंत बेंगळुरू वाहतूक पोलिसांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम केले.
त्यांना 1996 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्ण पदक, 2002 मध्ये पोलीस पदक आणि 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
0 Comments