चोरून काढलेल्या फोटोंचा गैरफायदा : अत्याचार करीत विवाहितेला केले गरोदर

अंघोळ करतांनाचे  चोरून फोटो  काढून ते सासरी दाखविण्याची धमकी देत शेतमालकाने  मजुर विवाहितेवर  वेळोवेळी लैंगिक अत्याचार करीत तिला गरोदर केले. तसेच जाब विचारणार्‍या विवाहितेच्या आई-वडीलांना देखील धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिंचखेडा येथील शेतमालकावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोंडाईचातील राणीपुरा व ह.मु चिंचखेडा (ता. धुळे) येथे राहणार्‍या 19 वर्षीय पीडित विवाहितेने धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पुर्वी पीडिता हिचे आई-वडील हे आनंदा दगा पाटील (रा. चिंचखेडा) याच्या सन्नई शिवारातील शेतात मजुरी करीत राहत होते. तेव्हा ऑगस्ट ते नोव्हेंबर 2022 दरम्यान आनंदा पाटील याने पीडितेचे अंघोळ करतांना फोटो त्याने चोरून त्यांच्या मोबाइलमध्ये काढले
त्यानंतर ते तिला दाखवुन, हे फोटो तिच्या सासरी दाखविण्याची भिती दाखवली. तिच्या असहायतेचा गैरफायदा घेवून तिला एकांतात त्याच्या शेतात बोलावून तिच्याशी वेळोवेळी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती चार महिन्याची गरोदर राहिली
ही बाब पीडितेच्या आई-वडीलांना लक्षात आल्यानंतर ते जाब विचारण्यास गेले असता आनंदा पाटील याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली. कोणास काही सांगितले तर मोबाइलमधील पीडितेचे फोटो तिच्या सासरच्या लोकांना दाखवुन बदनामी करेल, अशी धमकीही दिली. या फिर्यादीवरून आनंदा पाटील यांच्याविरोधात भादंवि कलम 376, के, एन, 504, 506 सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e