दिल्लीमधील गोकुळपुरीमध्ये वृद्ध जोडप्याच्या घरात हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संशयातून सुनेला बेड्या ठोकल्या. चौकशी दरम्यान या दुहेरी हत्याकांडात मोठे खुलासे झाले आहेत. प्रेमात अडसर ठरणाऱ्या सासू सासऱ्यांचा सूनेनेच प्रियकरासोबत काटा काढला आहे. सून मोनिका पोलिसांच्या ताब्यात आहे पण प्रियकर फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
काय घडलं नेमकं ?
सून मोनिका आणि बॉयफ्रेंड आशिषने चार महिन्यांपूर्वीच सासू सासऱ्यांचा हत्येचा कट रचला होता. या प्लॅनिंगमध्ये आशिषने त्याच्या मित्राची मदत घेतली होती. मोनिकाच्या प्रेम संबंधाबद्दल पती आणि सासू सासऱ्यांना कळलं होतं. त्यामुळे तिला घरात डांबण्यात आलं होतं. एका मोनिकाचा फोन कुटुंबाच्या हाती लागला तेव्हा त्यात आशिषसोबतचे तिचे सेक्स चॅट त्यांना दिसले. ते वाचून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर तिचा फोनही घरच्यांनी काढनू घेतला होता.
त्यानंतर तिला घरच्यांनी संपर्कात राहण्यासाठी साधा फोन दिला. त्या फोनद्वारे तिने आशिषसोबत कॉल आणि भेटीगाठी सुरुच ठेवल्या होत्या. पण सासू सासरे तिच्यावर नजर ठेवून असल्याने त्यांचा प्रेमप्रकरणात ते अडसर ठरत होते. त्यांना मोकळेपणाने काही करता येतं नव्हतं. अखेर त्यांनी
अशी झाली दोघांची भेट!
मोनिकाचं लग्न रवीसोबत 2016 मध्ये झालं होतं. लॉकडाऊनच्या काळात तिला एक मुलगा झाला. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असायची. ती लग्नापूर्वी कॉल सेंटरमध्ये काम करायची. लग्नानंतर तिचं आयुष्य सासू सासरे नवरा आणि मुलाभोवती फिरत होती. साधारण 2020 मध्ये तिची ओळख बॉडीबिल्डर आशिषशी झाली. तो बाऊन्सर म्हणून काम करत असताना मोनिकासोबत त्याचा संपर्क वाढला. ते दोघे एकमेकांशी मोबाईल चॅटद्वारे बोलत होते.
त्यांच्यामधील जवळीक वाढत गेली. चॅटमधून ते सेक्सबद्दल बोलू लागले. फेब्रुवारी 2021 मध्ये व्हॅलेंटाईन डेला या प्रेमविरांनी हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं. गाझियाबादमधील एका हॉटेलमध्ये हे दोघे भेटले. धक्कादायक म्हणजे आशिषने मोनिकाची त्याचा आईशी प्रेयसी म्हणून ओळख करुन दिली होती. त्यावेळी आशिषच्या आईला माहिती नव्हतं की मोनिका ही विवाहत असून एका मुलाची आई आहे. आशिषच्या आईला समजल्यानंतर तिने या नात्याला विरोध केला. पण त्यांनी कोणाकडेही लक्ष दिलं नाही. एका दिवशी मोनिकाचं हे प्रकरण तिच्या पतीला कळलं. आशिष आणि मोनिकाचे चॅट त्याचा हाती लागले.
मोनिकाचा धक्कादायक खुलासा
पोलिसांच्या चौकशी मोनिकाने धक्कादायक खुलासे केले आहेत. ती म्हणाली की, ''मला त्या घरात राहताना तुरुंगात आहे असं वाटायचं. सासू सासऱ्यांचं माझ्या रोजच्या हालचालीवर लक्ष ठेवून असायचे. मला माझ्या कुठल्याही कृत्याचं वाईट वाटतं नाही आहे.''
मोनिकाच्या प्रतापानंतर तिच्या सासू सासऱ्यांनी राहत घर विकायला काढलं होतं. त्यामुळे मोनिका वैतागली होती. घरच्यांनी भगीरथ विहारमधील घर बघितलं होतं.
0 Comments