आयपीएस नीलेश अष्टेकरविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर (रा. आंबेगाव बुद्रूक, पुणे) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ठाण्यातील कळवा येथील एका ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश अष्टेकर यांनी पीडित महिलेच्या फेसबुकवर अकाऊंटवर मेसेज केला होता. त्यावरून संभाषणादरम्यान त्यांची ओळख झाली. त्यानंतर अष्टेकर यांनी मेसेंजरवर कॉलवर महिलेला पोलिस भरतीचे काम करून देतो, असे सांगितले. तसेच, मोबाईलवर अश्लील फोटो आणि मेसेज पाठविण्यास सुरवात केली. या संदर्भात महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e