जातीवाचक शिव्या दिल्‍याने अधिकाऱ्याला पडले महागात; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंताने एका वरिष्ठ तंत्रज्ञानाला  जातीवाचक शिव्या दिल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकाराने आदिवासी समाज आक्रमक झाला होता. याबाबत विद्युत वितरण कंपनीचे  उपकार्यकारी अभियंत्‍यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नंदुरबार जिल्‍ह्यातील धडगाव तालुक्‍यातील या प्रकारानंतर तक्रार केल्याने संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठ तंत्रज्ञानाला निलंबित केले. यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. धडगाव येथील विद्युत वितरण कंपनीचे कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञानाला विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख करत अश्लील शब्दाचा प्रयोग करत शिवीगाळ केली.
याप्रकरणी तालुक्यातील सामाजिक संघटना आक्रमक झाले असून समस्त आदिवासी संघटना आणि रोषमाळ बुद्रुक येथील ग्रामस्थांमार्फत आज धडगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निलंबित कर्मचाऱ्याला येत्‍या १० दिवसात सेवेत पुन्हा रुजू करण्यात येईल; असे आश्वासन प्रशासनाच्‍यावतीने देण्यात आले. यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम धडगाव पोलिस करत आहेत. मोर्चात आमदार आमशा पाडवी आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e