पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील स्टेशन रोड येथे चिमुकली कामानिमित्त आलेली होती. दरम्यान घरी सोडून देतो असे सांगून संशयीत आरोपी आकाश याने स्कुटीवर बसून तिला शहरातील टेनिस ग्राउंड येथे नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान चिमुकली रडू लागल्याने तिला घरी सोडून देऊन तू जर आई-वडिलांना सांगितले, तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली. दरम्यान आपल्यावर झालेला प्रसंग चिमुकलीने तिच्या आईजवळ सांगितला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पीडित मुलीसह तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी आकाश यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहे
0 Comments