शेंदुर्णीतील अट्टल चोरट्याला एलसीबीच्या बेड्याजळगावात चोरी, घरफोडीचे गुन्हे, सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जळगावसह बुलढाणा आणि शिरपूर घरफोडी, चोरी करणार्‍या अट्टल चोरट्याला  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  शेंदुर्णीतून जेरबंद केले . त्याच्याकडून दुचाकीसह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
शिरपूरातील करवंद रोडवरील शकुंतला लॉन्स समोर राहणारे चंद्रकांत साहेबराव पाटील यांच्याकडे दि.15 मे रोजी भरदिवसा घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 74 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शिरपुर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखेकडुन सुरू असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तात्रीक विष्लेषणाव्दारे हा गुन्हा संदीप अर्जुन गुजर (रा. शेदुर्णी, ता. जामनेर, जि.जळगाव) याने केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शेदुर्णी येथून आज दि. 19 रोजी संदीप गुजर यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देवुन गुन्हा करण्यासाठी वापरलेलेल्या दुचाकीसह मुद्देमाल काढून दिला. त्यांच्याकडून 40 हजारांची विना नंबर प्लेटची दुचाकीसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 1 लाख 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात दुचाकीबाबत खात्री केली असता देवळगाव राजा पोलीस स्टेशन (जि. बुलढाणा) येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपीला पुढील तपासासाठी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, कनिष्ठ तज्ञ, सपोनी योगेंद्रसिंग राजपुत, पोसई योगेश राऊत, असई धनंजय मोरे, पोलिस हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, पोना मायुस सोनवणे, मनोज ब्राम्हणे, पोलिस शिपाई कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, चालक कैलास महाजन, राजेश गिते यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e