मुक्ताई या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांसंदर्भात पुन्हा एकदा आवाज उठविला आहे. आ. खडसे म्हणाले की, विधानपरिषदेच्या अधिवेशनात जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत राज्याचे गृहमंत्री यांना प्रश्न विचारला मात्र त्यांनी देखिल याबाबत कुठलेही ठोस उत्तर दिले नाही. राज्य सरकारचा या अवैध धंद्यांना पाठींबाच असल्याचा आरोप आ. खडसे यांनी केला
एसपींना 22 वेळा पत्र दिले
आ. खडसे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात वाळु माफियांची मोठी दहशत माजली आहे. पत्त्यांचे क्लब जोरात सुरू आहे. वसुलीचे सर्व कार्यक्रम बिनधास्तपणे सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. तसेच त्यानंतरही 22 वेळा पोलीस अधीक्षकांना पत्र दिले व्हाट्स अॅपवर मेसेज पाठविले तरी देखिल कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत एकही लोकप्रतिनीधी बोलायला तयार नाही. त्यामुळे जिल्ह्याची अवस्था मोठी वाईट झाल्याचेही ते म्हणाले
ना. महाजनांनी शब्द खरा करुन दाखविला
भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी जळगाव शहराचे वर्षभरात रूप पालटून दाखविणार असा शब्द दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखविला आणि शहर खड्ड्यात घातले असा उपरोधिक टोला आमदार एकनाथराव खडसे यांनी लगावला. ना. महाजन हे उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे असतांना त्यांच्या गावाचे टेक्स्टाईल पार्क देखिल ते करू शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निवडणुका होणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमेटीची बैठक नुकतीच झाली असून खान्देशची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी 70 टक्के सदस्य नोंदणी झाली आहे त्याठिकाणी संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांच्या निवडणुका होतील. त्यात धुळे शहर आणि ग्रामीण यांचा समावेश असून दुसर्या टप्प्यात जळगावच्या निवडणुका होतील असे आ. खडसे यांनी सांगितले.
0 Comments