Instagram वरची मैत्री पडली महागात, चालत्या कारमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

चालत्या कारमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार आसाममध्ये घडला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे
आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात ही घटना मंगळवारी घडली असून सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अनवर हुसैन आणि मोमिनुर रहमान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण 19-24 वयोगटातील असून मूळचे धुबरी जिल्ह्यातील आहेत. रुबेल आणि इम्रान हे शालेय विद्यार्थी आहेत, तर मोमिनूर हा चालक म्हणून काम करतो. अनवर काही करत नाही.
वरिष्ठ पोलिस अधिकारी नूर इस्लाम सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मंगळवारी दुपारी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने एक कार अडवली आणि चौकशीदरम्यान संशयास्पद दिसल्यानंतर तरुण आणि तरुणीला पोलिस ठाण्यात आणले.' त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
१३ वर्षीय तरुणीची रुबेलशी ओळख होती. ती मुलगी रुबेलच्या काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आली होती. घटनेच्या दिवशी तो तरुण तिच्या मित्रांसह धुबरीहून तिला भेटायला आला आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे," असे अधिकारी म्हणाले
आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहितीदेखील पोलिस अधिकाऱ्याने यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e